जेवणानंतर बडीशेप आणि जिरे खाण्याची परंपरा खूप जुनी आहे. याचे खूप काही फायदे होतात.
बडीशेप आणि जिरे हे दोन्ही अन्न पचवण्यात आणि पचनसंस्था मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
जेवणानंतर एक चमचा बडीशेप आणि जिरे घेतल्याने पोट हलके होते आणि अन्नाचे पचन सोपे होते.
बडीशेप आणि जिरे या दोन्हीमध्ये असलेले सक्रिय संयुगे पाचक एंजाइम सक्रिय करतात, त्यामुळे अपचन टाळता येते.
हे मिश्रण गॅस, अॅसिडिटी आणि पोटफुगीची समस्या कमी करण्यास मदत करते.
बडीशेपमध्ये ॲण्टी स्पास्मोडिक गुणधर्म असते. जे पोटातील पेटके आणि उबळ दूर करण्यास मदत करते.
जिरे पोटातील वायू काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे पोट हलके आणि आरामदायी वाटते.
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि ती नैसर्गिक तोंडाला ताजेतवाने करते.