मखानामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. यामुळे वजन नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते आणि ऊर्जा मिळते. संध्याकाळच्या चहाच्या वेळी तळलेल्या पदार्थांऐवजी मखाना खाणे जास्त फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
मखान्यामध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि संध्याकाळच्या वेळी होणारी अवाजवी भूक शांत होते.
Picture Credit: Pinterest
यात मुबलक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
Picture Credit: Pinterest
मखान्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप कमी आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
मखान्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
संध्याकाळच्या थकव्यानंतर मखाना खाल्ल्यास शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो.
Picture Credit: Pinterest
यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने संध्याकाळी मखाना खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
Picture Credit: Pinterest
संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी मखाना थोड्याशा गाईच्या तुपात किंवा तेलात थोडे काळे मीठ आणि काळी मिरी घालून हलका भाजून घ्यावा.