हिवाळ्यात ओवा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
Image Source: Pinterest
ओव्यात थायमॉल घटक असतो, जो पचन रसांची निर्मिती वाढवतो. अपचन, पोटफुगी, गॅस, आम्लपित्त यावर आराम मिळतो.
ओवा उष्ण प्रकृतीचा असल्याने कफ कमी करतो. ओवा पाणी किंवा ओवा-मीठ घेतल्याने घसा दुखणे, खोकला कमी होतो.
हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यास ओवा मदत करतो, त्यामुळे थंडीचा त्रास कमी होतो.
ओव्यातील दाहशामक गुणधर्म सांधेदुखी व अंगदुखी कमी करतात. ओव्याचा काढा फायदेशीर ठरतो.
पचन सुधारल्याने चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते. सकाळी कोमट ओवा पाणी घेतल्यास वजन नियंत्रणास मदत होते.
ओव्यात अँटिऑक्सिडंट्स असल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते, हिवाळ्यातील आजारांपासून संरक्षण मिळते.