आपण एखाद्या शुभप्रसंगी किंवा देवाला नैवेद्य दाखवून केळीच्या पानात जेवतो ही परंपरा मानली जाते पण केळीच्या पानात जेवण्याने आरोग्याला काय फायदे होतात ते जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनोल्स नावाचे नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंटस असते. ज्यावेळी आपण पानावरती गरम अन्न वाढतो त्यावेळी हे घटक अन्नातील मिसळतात आणि पेशींमध्ये नुकसान टाळतात
Picture Credit: Pinterest
केळीच्या पानावर एक मेणासारखा नैसर्गिक थर असतो. गरम अन्नामुळे हा थर वितळतो आणि अन्नाला एक विशिष्ट सुगंधी आणि नैसर्गिक चव प्राप्त होते.
Picture Credit: Pinterest
केळीच्या पानांमध्ये औषधीय गुणधर्म असल्याने पचन सुधारण्यास मदत होते. त्यामुळे अन्नातील पोषक तत्वे शरीराला चांगल्या प्रकारे मिळते.
Picture Credit: Pinterest
हॉटेल किंवा कार्यक्रमांमध्ये स्टीलची स्वच्छता कशी केली जाते आपल्याला माहीत नसते त्याऐवजी केळीचे पान एकदाच वापरले जाते त्यामुळे जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.
Picture Credit: Pinterest
डिस्पोजेबल प्लेट्ससाठी नैसर्गिक पर्याय म्हणून केळीची पाने वापरणे हा पर्यावरणास अनुकूल पर्याय आहे. यामुळे प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या प्लास्टिक किंवा फोम प्लेट्सची गरज कमी होते.
Picture Credit: Pinterest
केळीच्या पानावर जेवल्याने पचन सुधारण्यास मदत होते. तसेच पर्यावरणासाठी अनुकूल असा हा पर्याय मानला जातो.
Picture Credit: Pinterest