डार्क सर्कल्सना म्हणा बाय-बाय! घरच्या घरी करा हे उपाय

Life style

17 April 2026

Author:  नुपूर भगत

काकडीचे पातळ काप करून डोळ्यांवर 10-15 मिनिटे ठेवा. यामुळे त्वचा थंड राहते आणि काळेपणा कमी होतो.

थंड काकडीचा वापर

Picture Credit: Pinterest

कापसावर गुलाबपाणी घेऊन डोळ्यांवर ठेवा. हे त्वचेला ताजेतवाने करून डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करते.

गुलाबपाणी लावा

Picture Credit: Pinterest

दररोज किमान 7-8 तास झोप घेणे खूप गरजेचे आहे. झोप पूर्ण नसल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे वाढतात.

पुरेशी झोप घ्या

Picture Credit: Pinterest

रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांभोवती हलक्या हाताने बदाम तेलाने मसाज करा. यामुळे त्वचेला पोषण मिळते.

बदाम तेलाने मसाज

Picture Credit: Pinterest

थंड केलेल्या टी बॅग्स (ग्रीन टी/ब्लॅक टी) डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवा. यामुळे सूज आणि काळेपणा कमी होतो.

टी बॅग्सचा वापर

Picture Credit: Pinterest

शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून 7-8 ग्लास पाणी प्या.

 पाणी भरपूर प्या

Picture Credit: Pinterest

मोबाईल, लॅपटॉपचा जास्त वापर टाळा. दर 20 मिनिटांनी डोळ्यांना विश्रांती द्या.

स्क्रीन टाइम कमी करा

Picture Credit: Pinterest