Published August 26, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
अननस नाही सामान्य, अनेक आजारांवर गुणकारी
अननस खाण्याने शरीराला अनेक लाभ मिळतात. विटामिन सी, मँगनीज आणि अनेक पोषक तत्व यात आढळतात
अननसमध्ये अधिक प्रमाणात पाणी असून शरीराला चांगले हायड्रेशन मिळवून देण्यास मदत करते
.
बदलत्या हवामानानुसार आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. अननसातील विटामिन सी इम्युनिटी वाढवते
अननस खाण्याने पचन योग्य होते आणि गॅसची समस्या कमी होण्यास फायदा मिळतो
हाय ब्लड प्रेशरच्या समस्येपासून सुटका मिळवून देण्यास अननस मदत करते
विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे अननसाने त्वचा चांगली राखण्यास मदत मिळते
अननस शरीरातील उर्जा टिकवून ठेवण्यास आधार देते
अननस लो कॅलरी फळ असून अधिक फायबर असल्याने वजन नियंत्रणात राखण्यास उपयोगी ठरते
कोणताही पदार्थ किती प्रमाणात खावा याचा सल्ला डॉक्टरांकडून घ्यावा आम्ही कोणताही दावा करत नाही