www.navarashtra.com

Published  Oct 19, 2024

By  Prajakta Pradhan

Pic Credit - iStock

हे फळ रिकाम्या पोटी का खावे?

फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, रोज सकाळी रिकाम्या पोटी एक डाळिंब खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

फायदे

डाळिंबात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

प्रतिकारशक्ती

सकाळी रिकाम्या पोटी एक डाळिंब खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासही मदत होते.

पचन

.

सकाळी डाळिंब खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते कारण ते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकते.

हृद्य

.

सकाळी रिकाम्या पोटी एक डाळिंब खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते कारण डाळिंब हे कमी कॅलरी असलेले फळ आहे.

वजन कमी होणे

डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला सुधारतात आणि आरोग्य राखण्यासाठी सुरकुत्या कमी करतात.

त्वचा

डाळिंबाचे सेवन केल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते तुम्ही सकाळी एक डाळिंबाचे सेवन करू शकता.

ताण

डाळिंब हे लोहाचा एक चांगला स्रोत मानला जातो, जो अशक्तपणा दूर करण्यास मदत करतो.

अशक्तपण