कोणत्या आजारांध्ये टोफू खावे, जाणून घ्या

Life style

26 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

टोफू हे दिसायला पनीरसारखे असते. याला सोया पनीरच्या नावाने ओळखले जाते. शाकाहारी लोकांसाठी टोफू हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे आणि त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

टोफू आहे निरोगी

जर तुम्ही रोज टोफू खात असाल तर तुम्हाला याचे शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घ्या

टोफू खाण्याचे फायदे

टोफूमधील प्रथिने

टोफूमध्ये प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नीज, आयरन, कमी कॅलरीज असे घटक असतात. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे.

रक्ताची कमतरता

जर तुम्हाला शरीरात रक्ताची कमतरता जाणवत असेल तर तुम्हाला रोज टोफू खायला हवे त्यामध्ये आयरन असते. आयरन रक्ताची कमतरता दूर करते

वजन होईल कमी

जे लोक आपले वजन कमी करु इच्छित आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये टोफू समाविष्ट करावा. हे खाल्ल्याने तुमचा चयापचय कमी होऊ शकतो

हाडं होतील मजबूत

हाडं मजबूत बनवण्यासाठी तुम्हाला टोफूचे सेवन करायला हवे. कारण यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण असते आणि कॅल्शिअम हे हाडांसाठी सर्वोत्तम मानले जाते.

वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट होईल

सकाळ संध्याकाळ टोफू खाण्याचा सर्वांत मोठा फायदा हा आहे की, यामुळे तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल दूर होऊ शकते, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहू शकते.

टोफू मर्यादित प्रमाणात खा

टोफू हे मर्यादित प्रमाणात खावे. जास्त खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते.