Published Feb 16, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
मध आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे हे आपण जाणतोच. पण याचे नेमके फायदे काय? चला जाणून घेऊया.
मध नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत आहे, जो झटपट उर्जेसाठी उपयुक्त ठरतो.
मधात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवाणूरोधक गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात मदत करतात.
सकाळी उपाशीपोटी मध पाणी प्यायल्यास मेटाबॉलिझम सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मधाचे जीवाणूनाशक गुण घशाची खवखव आणि खोकल्यापासून आराम देतात.
मध पचनेसाठी उपयुक्त आहे, त्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
मध नैसर्गिक मॉइश्चरायझर असून त्वचेला चमक आणि सौंदर्य देतो.
मध कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.