www.navarashtra.com

Published March 09,  2025

By  Mayur Navle 

रोज किवी खाल्यास काय होईल?

Pic Credit - iStock

किवीमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते.

इम्युनिटी वाढते

किवीमध्ये फायबर असते, जे अन्न सहज पचण्यास मदत करते.

पचनसंस्था सुधारते

किवीमधील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.

हृदयासाठी फायदेशीर

किवीत असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E मुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर तजेलपणा येतो.

त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त

किवीमध्ये ल्युटीन आणि अन्य घटक असतात, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.

डोळ्यांच्या आरोग्यास मदत

किवीमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असते, त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी ते सुरक्षित आणि फायदेशीर फळ आहे.

रक्तातील साखर नियंत्रित राहते

किवीमध्ये असलेले सेरोटोनिन तणाव कमी करण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत करते.

मानसिक तणाव कमी होतो

कसं पडलं नागपूर शहराचं नाव? 3000 वर्ष जुना आहे शहराचा