www.navarashtra.com

Published Jan 31,  2025

By  Mayur Navle

Laughter Therapy चे आरोग्यावर होणारे भन्नाट फायदे

Pic Credit -  iStock

ही एक थेरपी आहे ज्यात हास्याचा उपयोग रुग्णांची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. चला या थेरपीचे फायदे जाणून घेऊया.

लाफ्टर थेरपी

हसल्याने शरीरातील तणाव निर्माण करणारे हार्मोन कमी होते आणि मन शांत राहते.

तणाव कमी करते

जोरात हसल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय निरोगी राहते.

रक्ताभिसरण सुधारते

हसल्याने शरीरात एंडॉर्फिन्स सक्रिय होतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

हसल्याने आनंदी भावना निर्माण होतात. तसेच नैराश्य व चिंता दूर होते.

मूड सुधारते

जोरात हसल्याने फुप्फुसांची क्षमता वाढते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन मिळते.

श्वसनसंस्था सुधारते

एकत्र हसल्याने सामाजिक नाती अधिक दृढ होतात आणि सकारात्मक  ऊर्जा निर्माण होते.

नाती बळकट होतात

नियमित हसण्याने दीर्घायुष्य मिळू शकते, कारण ते शरीर आणि मन  दोघांना निरोगी ठेवते.

दीर्घायुष्य मिळते

डेटवर जाण्यापूर्वी करा हे घरगुती उपाय, दिसाल सुंदर