हल्ली अनेक जण पाण्यात सब्जा मिसळून पित असतात.
Picture Credit: Pinterest
मात्र, याचा फायदा काय? चला याबद्दल जाणून घेऊयात.
सब्जा बिया शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देतात.
यामध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन सारख्या समस्या कमी होतात.
पाण्यात फुगल्यावर या बिया पोट भरण्याचा फील देतात, त्यामुळे भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते.
पोटात जळजळ, गॅस किंवा ॲसिडिटी कमी होते.