गरम पाण्यात पाय का ठेवून बसावे जाणून घ्या 

Life style

19 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

दिवसभराच्या धावपळीनंतर खूप थकवा जाणवतो. अशावेळी गरम पाण्यामध्ये अर्धा तास पाय बुडवून बसल्यास थकवा दूर होतो आणि ताजेपणा जाणवतो. गरम पाण्यात पाय टाकून बसण्याचे फायदे जाणून घ्या

दिवसभराचा थकवा

पूर्ण दिवस चालणे फिरणे किंवा उभे राहून काम केल्याने पाय दुखण्याच्या समस्या कमी होतात आणि थकवा देखील हळूहळू कमी होतो 

थकवा आणि दुखण्यापासून आराम

रक्ताभिसरण चांगले होते 

गरम पाण्यामुळे नसांना आराम मिळतो. यामुळे रक्ताभिसरण होण्यास मदत होते. ज्या लोकांना थंडीमध्ये पाय सुंदर होणे आणि मुंग्या येण्याच्या समस्या आहेत अशांना फायदा होतो 

चांगली झोप येणे 

झोपण्याच्या पंधरा ते वीस मिनिटे आधी गरम पाण्यात पाय टाकून बसावे. यामुळे झोप लवकर येते आणि वारंवार झोप तुटण्याची समस्या दूर होते 

ताण आणि मानसिक तणाव 

पायांमध्ये काही पॉईंट्स असतात. गरम पाण्यामुळे यावर सकारात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे डोकं शांत राहते आणि  तणाव, चिंता आणि भीती कमी होते 

सर्दी खोकल्यापासून आराम 

गरम पाण्यात पाय टाकून बसल्याने शरीर आतून गरम होते. यामुळे सर्दी खोकला, डोकं दुखणे आणि थंडी वाजण्याच्या समस्येपासून आराम मिळतो 

भेगा पडलेल्या टाचा 

नियमित गरम पाण्यात पाय भिजवल्याने टाचांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. पाय भिजवून झाल्यानंतर ते हलक्या हाताने पुसून घ्या.

पायांची सूज कमी होते

खूप वेळ बसल्याने किंवा उभे राहिल्याने पायाला सूज येते. गरम पाण्यात पाय ठेवल्याने कोरडेपणा दूर होतो आणि पायांना हलके जाणवते.