श्रावण महिन्यात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध प्रकारचे उपाय करतात.
महादेवांना प्रसन्न करण्यासाठी लोक या महिन्यात त्यांचे आवडते वस्तू धारण करतात त्यापैकी एक रुद्राक्ष
असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे आणि म्हणूनच ते पवित्र मानले जाते. काही जण ते गळ्यात घालतात तर काही जण हातात.
रुद्राक्ष धारण करण्यासाठी सर्वोत्तम महिना म्हणजे श्रावण. हे खूप प्रकारचे असतात. पण सर्वात प्रभावी पंचमुखी रुद्राक्ष मानले जाते. जाणून घ्या फायदे
मान्यतेनुसार जो कोणी विधीवत पंचमुखी रुद्राक्ष परिधान करतो त्याला मानसिक शांती मिळते. मन अनावश्यकपणे विचलित आणि अस्वस्थ राहत नाही.
हे रुद्राक्ष धारण केल्याने आध्यात्मिक शक्ती प्राप्त होण्यास मदत होते.
ज्योतिषशास्त्रानुसार, संपत्ती आणि समृद्धीसाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे चांगले मानले जाते.
श्रावण महिन्यात जे कोणी रुद्राक्ष धारण करतात त्यांना अकाली मृत्यूची भीती राहत नाही. ते ढाल म्हणून काम करते.
गुरु ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते. तसेच वैवाहिक जीवनात सुख शांती लाभते.