www.navarashtra.com

Published Sept 28, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

लाकडाचा कंगवा वापरण्याचे फायदे

अधिक लोक हे केस प्लास्टिकच्या कंगव्याने विंचरताना दिसतात, यामुळे केसांचा गुंता सुटतो पण तितका फायदा मिळत नाही

प्लास्टिक कंगवा

सध्या लाकडी कंगवा तुम्हाला बाजारात दिसत असेल आणि याचा वापरण्याचा ट्रेंडही वाढत चालला आहे, कारण याचे अधिक फायदे आहेत

लाकडी कंगवा

लाकडी कंगव्यामुळे स्काल्प हेल्दी होऊन रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळते आणि केस हेल्दी राहतात

रक्तप्रवाह

.

लाकडी कंगवा वापरल्याने केसातील खाज कमी होते आणि यामुळे कोंड्याची समस्याही कमी होते

कोंडा

.

प्लास्टिक कंगव्याच्या तुलनेत लाकडी कंगवा हा वातावरणासाठीही योग्य असून बायोडिग्रेडेबल आहे

बायोडिग्रेडेबल

लाकडाचा कंगवा हा साधारणतः चंदन, कडुलिंब, बास यांच्या लाकडापासून बनविण्यात येतो, जो स्वच्छ करणेही सोपे आहे

कसे बनते

केसांचे नुकसान होण्यापासून लाकडी कंगवा वाचवतो आणि केसगळतीही कमी होते

नुकसान

प्लास्टिकच्या कंगव्यात केस अडकून खेचले जातात, मात्र लाकडी कंगव्याने असे होत नाही. त्यामुळे केस चांगले राहतात

केसगळती

लाकडी कंगव्यात अँटीबॅक्टेरियल गुण असून केसात इन्फेक्शन होण्यापासून वाचवतात

अँटीबॅक्टेरियल

केसांना मेथी आणि कलौंजी लावण्याचे फायदे