या सवयी लावल्याने चाळीशी नंतर सुद्धा मेंदू राहील तरुण 

Lifestyle

24 October, 2025

Author: मयूर नवले

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू.

मेंदू 

Picture Credit: Pinterest

मात्र, चाळीशीनंतर तुम्ही तुमचा मेंदू कसा चांगला ठेवू शकतात? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

चाळीशी नंतरचा मेंदू

रोज व्यायाम केल्याने शरीर तर तंदुरुस्त राहतेच. मात्र, याशिवाय मेंदू सुद्धा चांगला राहतो.

रोज करा व्यायाम

मेंदूच्या आरोग्यासाठी ओमेगा 5, अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन महत्वाचे असते. म्हणूनच आहारात मच्छी, अक्रोड आणि हिरव्या भाज्या समाविष्ट करा.

हेल्दी फूड

एक अभ्यासात असे आढळून आले की जी लोकं नवनवीन स्किल्स शिकतात त्यांचा मेंदू वेगवान असतो.

नवनवीन स्किल्स शिका

पुरेशी झोप घेतल्याने आपला मेंदू शार्प होतो आणि स्ट्रेस सुद्धा कमी होते.

झोप सुद्धा महत्वाची

एका रिसर्चनुसार, जे व्यक्ती कुटुंब, मित्रपरिवार किंवा खास व्यक्तीसोबत जोडले असतात. त्यांचा मेंदू शार्प असतो.

सोशल कनेक्शन