Published Oct 24, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
गूळ या वेळी खाल्ल्यास दूर राहतील अनेक आजार
शरीर हेल्दी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि योग्य वेळ जपणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी डाएटमध्ये योग्य पदार्थ खावा
गूळ खाणे शरीरासाठी चांगले ठरते. साखरेपेक्षा गूळ हा आरोग्यासाठी उत्तम असतो असे मानले जाते
गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, झिंक, तांबे आणि अँटीऑक्सिडंट्स असून अनेक फायदे होतात
.
उपाशीपोटी गूळ खाणे अधिक लाभदायक ठरते. पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाशी संबंधित त्रास कमी होतो
.
दुपारचे जेवण झाल्यानंतर गूळ खाल्ल्यास, पोट फुगणे, गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून दूर राहता येते
गुळाचे सेवन रात्री झोपण्याच्या आधी केल्यास प्रतिकारशक्ती मजबूत होते. झोप चांगली लागते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो
गुळात लोह असून हिमोग्लोबिन वाढवते आणि एनिमियाचा त्रास शरीराला होऊ देत नाही
तुम्ही चेहऱ्यावरील टॅनिंगमुळे त्रासला असाल तर या फेसमास्कचा नियमित वापर करून टॅनिंग कमी करू शकता
आपल्या त्वचारोगतज्ज्ञांच्या संमतीनुसार वापरा, आम्ही कोणताही दावा करत नाही