Published Jan 11, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
रोज एकाच वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराचा नैसर्गिक बायोलॉजिकल क्लॉक नियमित होतो. वापर बंद करा.
झोपण्याच्या किमान १ तास आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांसारख्या स्क्रीनचा वापर बंद करा.
रात्री कॅफिनयुक्त पदार्थ, चहा, कॉफी किंवा अल्कोहोलचा वापर टाळा.
रात्री हलके जेवण करा, जे लवकर पचेल. जड आहार झोपेत व्यत्यय आणते.
झोपण्यापूर्वी ध्यान, प्राणायाम किंवा रिलॅक्सेशन टेकनिक अवलंब करा. यामुळे मन शांत होते आणि झोप लवकर लागते.
तुमची झोपण्याची खोली अंधारी, शांत आणि हवेशीर ठेवा. उश्या आणि गाद्या आरामदायक असाव्यात.
नियमित व्यायाम केल्याने शरीर थकते आणि रात्री झोप लवकर लागते.
झोपण्याच्या आधी ऑफिसचे किंवा वैयक्तिक काम टाळा.