www.navarashtra.com

Published Oct 15, 2024

By Narayan Parab 

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार

Pic Credit -  Social Media, Pintrest

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची आज जयंती. वैज्ञानिक कलाम सरांची लोकांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती. 

लोकांचे राष्ट्रपती

भारतातील आदर्शवत अशा व्यक्तीमत्वांपैकी कलाम सर एक आहेत. जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार

आदर्शवत

"स्वप्न ती नसतात जी झोपेत पाहतो, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही."

स्वप्न

"आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नाही. परंतु, आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे."

प्रतिभा 

"स्वप्न, स्वप्न, स्वप्न. स्वप्नांचे रूपांतर विचारांमध्ये होते आणि विचारांचे परिणाम कृतीत होतात"

स्वप्न, विचार, कृती

"यशाच्या कथा वाचू नका, तुम्हाला फक्त एक संदेश मिळेल. अपयशाच्या कथा वाचा, तुम्हाला यश मिळवण्यासाठी काही कल्पना मिळतील."

अपयशाच्या कथा  आणि प्रेरणा

"तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचे भविष्य नक्कीच बदलतील.”

सवय आणि भविष्य

"जेव्हा तुमच्या आशा, स्वप्ने आणि ध्येये धुळीस मिळतील, तेव्हा भग्नावशेषांमध्ये शोधा, तुम्हाला अवशेषांमध्ये लपलेली सुवर्णसंधी सापडेल."

सुवर्णसंधी