Published Oct 10, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
जीवनात यशस्वी होण्यासाठी रतन टाटांचे यशस्वी कोट्स
टाटा समूहाचे अध्यक्ष आणि उद्योगपती रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण जगभरात हळहळ व्यक्त होतेय
रतन टाटांची शिकवण आणि गोष्टी या एखाद्याच्या मनाला आणि आयुष्याला उभारी देणाऱ्या आहेत. तुम्ही कायम यशस्वीच व्हाल
तुम्ही रतन टाटांच्या काही गोष्टी गाठिशी बांधल्या तर आयुष्यात कधीही दुःख, संकटांना सामोरे जाताना डगमगणार नाही
.
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढउतार असणे अत्यंत गरजेचे आहे असे टाटा यांचे म्हणणे होते
.
तुम्हाला वेगाने जायचंय तर एकट्याने चाला, मात्र लांब पल्ला गाठायचा असेल तर सर्वांच्या साथीनेच काम करा
अपयश हे येतेच पण त्यातून बाहेर पडून यशाचा प्रयत्न करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे
केवळ नशीबावर अवलंबून राहणे चुकीचे आहे त्यासाठी प्रचंड मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा
आपल्या चुकांमधून शिका आणि मगच आयुष्यात पुढे चला. यामुळे यश टिकून राहते
टीव्ही वा चित्रपटातील जगणं हे खरं नाही आणि आयुष्य हे टीव्ही चित्रपटांसारखंही नाही
खऱ्या आयुष्यात आराम नसतो फक्त आणि फक्त काम असते हे लक्षात ठेवा - रतन टाटा
कोणतंही काम पूर्ण करण्याची एक वेळ आखून घेतली पाहिजे आणि तेच काम करावं ज्यात तुम्हाला आनंद मिळतो