Published Jan 03, 2025
By Sayali Sasane
Pic Credit- Instagram
२०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस बॉलीवूड अनेक चित्रपटांचे सिक्वेल पाहायला मिळणार आहे. हे चित्रपट कोणते आहेत जाणून घेऊयात.
दे दे प्यार दे या चित्रपटाच्या यशानंतर आता अजय देवगण लवकरच 'दे दे प्यार दे 2' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.
तसेच अभिनेत्याचा दुसरा आगामी चित्रपट 'सन ऑफ सरदार 2' देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटामध्ये मृणाल ठाकूर देखील दिसणार आहे.
वॉर चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता हृतिक रोशन आणि जूनियर एन.टी वॉर 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत.
अजय देवगणचा तिसरा सिक्वेल चित्रपट 'रेड 2' देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये थ्रिल आणि सस्पेन्स पाहायला मिळणार आहे.
हे सिक्वेल चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना वेगळाच आनंद होणार आहे. अनेक काळाच्या प्रतीक्षेनंतर हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या पाचही चित्रपटांच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे सिक्वेल किती कमाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
.