भारतात मधुमेह असणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
लोकांना या आजाराविरुद्ध जागरूक करण्यासाठी आज जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो.
मधुमेह झाल्यावर किडनीवर देखील परिणाम होण्याची शक्यता असते.
साखरेची अतिरिक्त पातळी किडनीमधील ब्लड वेसल्सला धोका पोहोचवते.
मधुमेह असणाऱ्या लोकांना उच्च रक्तदाबाचा धोका असतो.
मधुमेह असल्यास डोळ्यांवर देखील परिणाम होतो. अंधुक दिसण्याची शक्यता असते.