एका पातेल्यात मॅक्रोनी पास्ता उकळून घ्या. पाणी गाळून थंड होऊ द्या आणि बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात बटर किंवा तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट आणि कांदा घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता त्यात गाजर, शेंग आणि टोमॅटो घालून २-३ मिनिटे परतून घ्या, जेणेकरून भाज्या थोड्या शिजतील पण क्रंची राहतील.
Picture Credit: Pinterest
मीठ, मिरी पावडर, चिली फ्लेक्स घालून चांगले मिसळा आणि नंतर दोन कप स्टॉक किंवा पाणी घाला.
Picture Credit: Pinterest
सूपाला एक उकळी येऊ द्या आणि नंतर गॅस मंद करून ५ मिनिटे शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
शेवटी उकडलेला मॅक्रोनी पास्ता सूपमध्ये घालून २ मिनिटे शिजवा, जेणेकरून सर्व चव एकत्र येईल.
Picture Credit: Pinterest
गॅस बंद करा, वरून कोथिंबीर किंवा पार्सले घाला आणि गरमागरम सूप सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest