मोबाईल-लॅपटॉपची ब्लू लाइटमुळे चेहरा खराब होतो आहे का?

Lifestyle

31 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

त्वचेला हानी

हल्ली सतत लोक स्क्रीनच्या संपर्कात येत असल्यामुळे केवळ डोळ्यांना हानी होत नाही तर त्वचेवर अकाली वृद्धत्वाची लक्षणेही दिसू शकतात. फोन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतो.

Picture Credit: Pinterest

अकाली चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या येऊ शकतात. जर तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला बराच वेळ स्क्रीनसमोर बसावे लागत असेल, तर काही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

काळजी घेणे 

Picture Credit: Pinterest

ब्लू लाइटमुळे त्वचेला त्रास होत असल्यास कोणत्या टिप्स वापराव्यात जाणून घ्या

काय करावे

Picture Credit: Pinterest

तुम्ही तुमच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावता, त्याचप्रमाणे निळ्या प्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी तुमच्या त्वचेच्या काळजीच्या दिनचर्येत ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीनचा समावेश करा.

सनस्क्रीन लावायला विसरू नका

Picture Credit: Pinterest

मॉइश्चरायझर लावा

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, त्वचेतील ओलावा टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमचा फोन किंवा लॅपटॉपचा वापर जास्त असल्यास जेल-आधारित किंवा पाण्यावर आधारित मॉइश्चरायझर वापरू शकता. हायल्यूरॉनिक मॉइश्चरायझर सर्वोत्तम मानले जाते.

Picture Credit: Pinterest

स्क्रीनपासून अंतर ठेवा

Picture Credit: Pinterest

काम करताना किंवा फोन वापरताना, आपला चेहरा स्क्रीनपासून किंचित दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोळ्यांचे नुकसान कमी होते आणि त्वचेचा निळ्या प्रकाशाशी संपर्कही कमी होतो. सतत काम करण्याऐवजी, वारंवार विश्रांती घ्या.

भरपूर पाणी प्या

Picture Credit: Pinterest

तुमची त्वचा आतून हायड्रेटेड राहील याची काळजी घ्या, कारण कोरडी त्वचा खूप संवेदनशील असते आणि त्यावर बारीक सुरकुत्या पडण्याची शक्यता असते. दररोज पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि तुमची त्वचा चमकदार राहते.