www.navarashtra.com

Published Jan 22,  2025

By  Mayur Navle

मुलुंडमध्ये लवकरच पक्षी उद्यान उभारले जाणार 

Pic Credit -  iStock

मुंबईकरांना सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्न करत असते.

मुंबई

मुंबईकरांच्या विरंगुळ्यासाठी शहरात अनेक उत्तम उद्यान आणि संग्रहालय आहेत.

विरंगुळ्याचे ठिकाणं

भायखळा येथील राणीची बाग हे तर मुंबईकरांच्या विशेष ठिकाणांपैकी एक आहे. 

राणीची बाग

पण आता लवकरच एक नवीन विरंगुळ्याचे ठिकाण मुंबईकरांसाठी बनवले जाणार आहे.

नवीन ठिकाण

मुंबईतील मुलुंड पूर्व या भागात पक्षी उद्यान प्रकल्पाला आता वेग आला आहे.

नवीन पक्षी उद्यान 

मुलुंड येथील पक्षी उद्यानात १८ दुर्मीळ प्रजातींसह २०६ प्रजातींचे पक्षी  असणार आहेत.

विविध पक्षी

या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी पक्षांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे.

पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

या उद्यानासाठी तात्पुरती परवानगी मिळाली पण अद्याप काही गोष्टींची पूर्तता बाकी असल्याने यावर्षी या प्रकल्पाला वेग देऊ असे मनपा आयुक्तांनी सांगितले.

२०२५ मध्ये प्रकल्पाला वेग

मेडिटेशन करण्याची योग्य वेळ आणि किती वेळ करावे?