EV खरेदीत जास्त पैसे खर्च करणं खरंच फायदेशीर? Range ते Safety, जाणून घ्या फरक

Automobile

16 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

₹15 लाखांच्या आत Tata Tiago EV, Punch EV आणि इतर पर्याय उपलब्ध आहेत. Tiago EVची claimed range 285 किमीपर्यंत आहे, तर मोठ्या बॅटरीसह Punch EVची range 450 किमीपेक्षा जास्त असल्याचा दावा आहे.

Budget EVमध्ये काय मिळतं?

Picture Credit:tata

Mahindra BE 6 ची किंमत सुमारे ₹18.90 लाखांपासून, XEV 9e ची ₹21.90 लाखांपासून, तर XEV 9S ची ₹20.65 लाखांपासून सुरू होते. म्हणजे Budget EVच्या तुलनेत खर्च नक्कीच वाढतो.

Premium EVसाठी किती खर्च?

Picture Credit:mahindra

Nexon EVची real-world range साधारण 300–375 किमीच्या आसपास राहते. याउलट Mahindraच्या 79 kWh बॅटरीसह BE 6ची claimed range 682 किमी, तर XEV 9eची 656 किमीपर्यंत आहे.

सर्वात मोठा फायदा: Range!

Picture Credit:mahindra

Premium EVs प्रत्यक्ष वापरात साधारण 450–500 किमी+ range देऊ शकतात. त्यामुळे लांब प्रवासात charging stops कमी होतात आणि range anxietyही कमी होते.

Highwayवर फरक जाणवतो!

Picture Credit:Tata

Tiago EV आणि Punch EVचा भर प्रामुख्याने शहरातील आरामदायी ड्रायव्हिंगवर आहे. BE 6 आणि XEV 9e मात्र 0-100 kmph सुमारे 6.7 सेकंदांत पूर्ण करतात. त्यामुळे highway overtaking आणि high-speed drivingमध्ये premium EVचा फायदा स्पष्ट दिसतो.

Performanceमध्ये मोठी उडी!

Picture Credit:Tata

Nexon EVमध्ये Level 2 ADAS मिळते. मात्र Mahindraच्या premium EVsमध्ये 5-radar + vision-based Level 2+ ADAS, driver monitoring आणि अतिरिक्त airbagसारखी सुरक्षा उपकरणे मिळतात.

Safetyमध्येही Premium EV पुढे

Picture Credit:Mahindra

XEV 9e आणि XEV 9Sमध्ये 43 इंचांपेक्षा मोठे triple screens, AR-HUD, 16-speaker Harman Kardon audio, memory seats, ambient lighting, wireless chargers आणि auto-park assist यांसारखी फीचर्स मिळतात.

Featuresचा फरक तर आणखी मोठा!

Picture Credit:Mahindra

जर तुमचा वापर मुख्यतः शहरात आणि कमी अंतरासाठी असेल तर Budget EV पुरेशी ठरू शकते. पण लांब प्रवास, highway performance, मोठी range, जास्त safety आणि premium features हवे असतील, तर Premium EVसाठी केलेला अतिरिक्त खर्च अधिक फायदेशीर ठरू शकतो.

मग जास्त पैसे खर्च करणं योग्य आहे का?

Picture Credit:Mahindra