2027 Jeep Wrangler JL-2A ने थेट 1945 मधील iconic Willys CJ-2A ची आठवण करून दिली आहे. Retro लूकसोबत आधुनिक Wrangler Rubiconची दमदार ऑफ-रोड क्षमता या SUVमध्ये पाहायला मिळते.
Picture Credit:jeep
1945 मध्ये आलेली Willys CJ-2A ही Jeepच्या civilian प्रवासातील महत्त्वाची SUV होती. आता तब्बल 80 वर्षांनंतर Jeepने त्याच वारशाला आधुनिक Wranglerच्या रूपात नव्या अंदाजात सादर केले आहे.
Picture Credit:jeep
JL-2A ही साधी cosmetic edition नाही. ही Wrangler Rubiconवर आधारित आहे. त्यामुळे Retro stylingसोबत serious off-road capability देखील कायम ठेवण्यात आली आहे.
Picture Credit:jeep
JL-2Aमध्ये Gobi रंग विशेष आकर्षण आहे. हा रंग जुन्या CJ-2Aच्या Harvest Tan shadeपासून प्रेरित आहे. याशिवाय '41, Bright White, Sting Gray, Ghost आणि Joose असे पर्याय मिळतात.
Picture Credit:jeep
या special editionमध्ये 17-inch Joose-painted retro wheels देण्यात आले आहेत. त्यावर 33-inch BFGoodrich KO2 all-terrain tyres मिळतात. Orange tow hooks या retro themeला आणखी उठाव देतात.
Picture Credit:jeep
केबिनमध्ये Heritage Tan Nappa leather, Bison Brown trim आणि Desert Orange stitching देण्यात आली आहे. Willys-Overland shifter medallion आणि खास HVAC graphicsमुळे जुन्या Jeepची आठवण कायम राहते.
Picture Credit:jeep
1945च्या Jeepमध्ये कल्पनाही करता आली नसती अशी आधुनिक फीचर्स JL-2Aमध्ये आहेत. Front TrailCam with washer, remote start, auto-dimming rear-view mirror आणि universal garage-door opener यांचा समावेश आहे.
Picture Credit:jeep
JL-2A ही Twelve 4 Twelve मालिकेतील 11वी special Wrangler आहे. या मालिकेत 12 महिन्यांत 12 वेगवेगळ्या limited-edition Wrangler सादर केल्या जात आहेत.
Picture Credit:jeep
JL-2A packageची किंमत $4,995 आहे. म्हणजे समान equipment असलेल्या Rubiconपेक्षा सुमारे $115 अधिक. मात्र या Editionची खरी खासियत किंमतीपेक्षा 1945च्या Willys CJ-2Aशी जोडलेला heritage आहे.
Picture Credit:jeep