भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे.
Img Source: Social Media
BYD ही चिनी ऑटो कंपनी देशात अनेक उत्तम इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे.
भारतात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त BYD इलेक्ट्रिक कार BYD Atto 3 आहे.
भारतात ही कार डायनॅमिक, प्रीमियम आणि सुपीरियर अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. डायनॅमिक हा बेस तर सुपीरियर टॉप मॉडेल आहे.
या कारला 49.92 kWh बॅटरीसह 468 किमी आणि 60.48 kWh बॅटरीसह 521 किमी पर्यंतची रेंज मिळते.
डीसी फास्ट चार्जर वापरून तुम्ही फक्त 50 मिनिटांत 0 ते 80% पर्यंत चार्ज करू शकता.
Euro NCAP आणि ग्लोबल NCAP मध्ये या कारने 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे.
BYD Atto 3 ची भारतातील किंमत 24.99 लाखांपासून सुरू होते. टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 33.99 लाखांपर्यंत जाते.