आंबा आणि दही एकत्र खाऊ शकतो का?

Written By: prajakta Pradhan

Source: Pinterest

आंब्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडेंट असते. हे खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि पचन सुधारते.

आंब्याचे फायदे

उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोट निरोगी राहते. उन्हाळ्यात दही खाणे खूप फायदेशीर आहे

दह्याने थंडावा

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे पोटदुखी आणि वेदना होऊ शकतात.

दोन्ही एकत्र खाणे

आयुर्वेदानुसार आंबा आणि दही या दोन्हीचा प्रभाव वेगळा असतो. आंबा गरम तर दही थंड असते. यामुळे हे दोन्ही एकत्र खाणे काही लोकांसाठी चांगले नाही.

आयुर्वेद 

जर तुमची पचनक्षमता कमजोर असेल तर आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने आपल्या पोटात गॅस, ॲसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

पोटाची समस्या 

लहान मुले आणि वृद्ध या दोन्ही गोष्टी सोबत देऊ नये. त्यांची पचनक्रिया कमजोर असते. त्यांना त्रास होऊ शकतो.

लहान मुले आणि वृद्ध 

जर तुम्हाला आंबा आणि दही एकत्र खायचे असेल तर  लक्षात ठेवा की दही ताजे आणि साधे असायला हवे. खूप ठंड आणि गोड दही सोबत खाऊ नये.

खाण्याची योग्य पद्धत