www.navarashtra.com

Published  Oct 10, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

उपाशीपोटी मेडिटेशन करणे योग्य आहे का?

मेडिटेशन अर्थात ध्यानधारणा करणे हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या उत्तम आहे. मात्र उपाशीपोटी मेडिटेट करणे योग्य आहे का?

ध्यानधारणा

सकाळी उठूनच ध्यान करावे तर उपाशीपोटी ध्यानधारणा करणे अधिक उत्तम आहे. यामुळे लक्ष अधिक केंद्रित होते

उपाशी

खाल्ल्यानंतर मेडिटेशन केल्याने शरीर पचनक्रियेत गुंतते आणि सर्व रक्तप्रवाह एका बाजूला होतो

खाऊन का करू नये

.

खाल्ल्यानंतर ध्यान केल्यावर मेंदूवर अधिक चांगला परिणाम होत नाही आणि यामुळे तुम्हाला झोपही येऊ शकते

मेंदूवर परिणाम

.

तुम्ही रिकाम्यापोटी मेडिटेशन केले तर लक्ष लवकर केंद्रित होते आणि आळस येत नाही

फायदे

खाल्ल्यानंतर कमीत कमी 2 तासाने ध्यानधारणा करावीं, त्वरीत मेडिटेशन केल्यास त्याचा शरीराला फायदा मिळत नाही

कधी करावे

रोज तुम्हाला 20-30 मिनिट्स मेडिटेशन करणे गरजेचे आहे, यामुळे लक्ष केंद्रित होऊन मन शांत राहतं

किती वेळ?

दिवसातून तुम्ही 10-10 मिनिट्स असे 3 वेळा मेडिटेशन केले तरीही योग्य ठरू शकते

कसे

आपल्या श्वासावर अथवा मंत्रावर तुम्ही लक्ष केंद्रीत करावे. सकारात्मकतेसाठी तुम्ही ॐ उच्चारण करू शकता

कसे कराल?