उन्हाळ्यात या कारणांमुळे फुटतात गाडीचे टायर

Automobile

09 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

उन्हाचा परिणाम

उन्हाळा सुरु होताच लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाचा केवळ माणसांवरच नाही तर गाड्यांवरही परिणाम होतो.

Picture Credit: Pinterest

टायरसाठी घातक

तीव्र सूर्यप्रकाश आणि वाढते तापमान गाडीच्या टायरसाठी विशेषत: धोकादायक ठरु शकते.

Picture Credit: Pinterest

जाणून घ्या कारण

उन्हाळ्यात गाडी चालवताना टायर अचानक फुटतो. हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. चला जाणून घेऊया यामागे काय कारण आहे.

Picture Credit: Pinterest

अत्यधिक उष्णतेमध्ये टायरमधील हवा प्रसरण पावते, त्यामुळे दाब वाढतो.

अत्यधिक उष्णता

Picture Credit: Pinterest

जर टायरमध्ये आधीच गरजेपेक्षा जास्त हवा भरलेली असेल तर तो फुटण्याचा धोका आणखी वाढतो. 

गरजेपेक्षा जास्त हवा

Picture Credit: Pinterest

त्याचप्रमाणे, जास्त वेळ सतत गाडी चालवल्याने टायर जास्त गरम होतात. ज्यामुळे खराब झालेले किंवा झिजलेले टायर लवकर फुटतात.

झिजलेले टायर

\Picture Credit: Pinterest

याशिवाय, क्षमतेपेक्षा जास्त भार असलेले वाहन चालवल्याने टायरवर अतिरिक्त दाब येतो, ज्यामुळे टायर फुटण्याचा धोका वाढतो.

टायर फुटण्याचा धोका

\Picture Credit: Pinterest

जास्त वेगाने गाडी चालवल्याने टायरचे तापमान वाढते आणि तो फुटतो.

टायरचे तापमान

\Picture Credit: Pinterest

वेळोवेळी टायरमधील हवेचा दाब आणि त्याची स्थिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरुन असे अपघात टाळता येतील.

टायरमधील हवेचा दाब

\Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?