Published 19, Nov 2024
By Shweta Chavan
Pic Credit - Social Media
विरारमध्ये मंगळवारी (19 नोव्हेंबर) दुपारी १.३० च्या सुमारास मोठा राडा झाला.
भाजप नेते विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला.
यामुळे विरार पूर्वमधील विवांत हॉटेलमध्ये बविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.
विरार पूर्व भागातील मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा सर्व राडा गेल्या तीन तासांपासून सुरु आहे.
भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक आणि काही पदाधिकारीही उपस्थित होते.
विनोद तावडे हे मतदारांना वाटण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला.
.
विनोद तावडे ज्या विवांत हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली.
.
बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. त्यांच्याकडे काही रक्कमही सापडली.
तावडे यांच्याकडे सापडलेल्या काही डायऱ्यांमध्ये पैशांच्या नोंदी आहेत. तो आकडा १५ कोटी रुपयांच्या घरात जातो.
.
वसई रोड ५, विरार पश्चिम ४ आणि नालासोपारा ५ अशा नोंदी ठाकूर यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवल्या आहेत.
.