Published 18, Nov 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
रायगड विधानसभेच्या सात जागा असून येथील प्रत्येक मतदारसंघातील लढती उत्कंटावर्धक ठरत आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल
महाडमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. येथे शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले विरुद्ध ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप अशी कडवी लढत होत आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या, मंत्री आदिती तटकरे यांची लढत अनिल नवगणे यांच्याशील होत आहे.
तीन वेळा आमदार असलेल्या भाजपच्या प्रशांत ठाकूर यांना ठाकरे गटाच्या लीना गरड आणि शेकापचे बाळाराम पाटील यांचे आव्हान आहे.
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून नितीन सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अपक्ष आमदार महेश बालदी यावेळी भाजपकडून लढत असून त्यांना ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी आव्हान दिले आहे.
.
भाजपचे आमदार रवीशेठ पाटील याची लढत शेकापचे अतुल म्हात्रे आणि ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांच्याशी होत आहे.
.
अलिबागमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींविरुद्ध शेकापच्या चित्रलेखा पाटील अशी थेट लढत होत आहे.
.