www.navarashtra.com

Published July 17, 2025

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

सतत जांभई का येते?

तुम्हाला झोप येत नसतानाही लागोपाठ जांभई का येते? यामागील कारण नक्की काय आहे जाणून घ्या

जांभई

मानसिक थकवा हे जांभई येण्याचे मुख्य कारण आहे. मेंदू जेव्हा जास्त काम करतो तेव्हा आराम करण्याची गरज आहे सांगताना जांभई येते

मेंदू

वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे जांभई एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही

नैसर्गिक

.

कधी कधी हवेत ऑक्सिजन कमी झाल्याने वा दीर्घकाळ एका जागी बसल्यानेही ऑक्सिजन मिळत नाही, जांभई आल्याने श्वास घेता येतो

ऑक्सिजन

.

तुम्ही सतत त्याचत्याच वातावरणात काम करत असाल वा त्याच गोष्टी ऐकत असाल तर कंटाळ्याने जांभई येते

कंटाळा

एकाला जांभई आली तर दुसऱ्यांनाही येते. जांभई ही संसर्गजन्य आहे. सामाजिक आणि सहानुभूतीशी संबंधित असते

परिणाम

थकव्याशिवायही सतत जांभई येत असेल तर ताण, मायग्रेन वा न्युरोलॉजिकल समस्या असू शकते, त्वरीत डॉक्टर गाठा

सतत

कमी झोप, दिवसभर थकवा यामुळेही सतत जांभई येऊ शकते. रात्री वेळेवर झोपून दिनचर्या आखा

अनियमितपणा

मोकळ्या हवेत जा, दीर्घ श्वास घ्या, पाणी प्या आणि ७-८ तास झोपा. जांभईची समस्या राहणार नाही

काय करावे

चेहऱ्यावर कोणत्या तेलाने करावे मालिश?