तरुण वयात गुडघेदुखी का होण्याची कारणे, जाणून घ्या

Lifestyle

29 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

गुडघेदुखीचा त्रास

बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आणि चुकीच्या सवयींमुळे आजकाल तरुणांमध्ये गुडघेदुखीचा त्रास सामान्य होत चालला आहे

Picture Credit: Pinterest

आयटी क्षेत्र किंवा डेस्क जॉब करणाऱ्या तरुणांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसते. सतत बसून राहिल्याने गुडघ्याचे स्नायू आखडतात आणि सांध्यांवर ताण येतो.

तासनतास एकाच जागी बसणे

Picture Credit: Pinterest

पुरेसा व्यायाम न करणे किंवा जिममध्ये ट्रेनरशिवाय वजन उचलल्याने लिगामेंट आणि मेनिस्कस दुखावतात. ज्यामुळे तरूण वयातच गुडघेदुखी सुरू होते. 

व्यायामाचा अभाव  

Picture Credit: Pinterest

शरीरात विटॅमिन डी, बी१२ आणि कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत होऊन वेदना सुरू होतात.

विटॅमिनची कमतरता  

Picture Credit: Pinterest

अतिरिक्त वजन

शरीराचे वाढते वजन गुडघ्यांवर दुप्पट भार टाकते, ज्यामुळे सांधे लवकर घासले जातात.

Picture Credit: Pinterest

चुकीची फूटवेअर

Picture Credit: Pinterest

नियमित हाय हिल्स किंवा खूप सपाट आणि कडक तळाचे बूट, चपला वापरल्याने चालताना पायाचा समतोल बिघडतो. ज्यामुळे गुडघ्यावर ताण येतो आणि दुखण्यास सुरुवात होते.

उपाय काय 

Picture Credit: Pinterest

आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध व सुकामेवा यांचा समावेश करावा. रोज सकाळी कोवळ्या उन्हात बसून विटॅमिन डी घ्यावे.