आंबट-तिखट टोमॅटो चटणीची सोपी रेसिपी

Life style

26 August 2026

Author:  नुपूर भगत

 टोमॅटो स्वच्छ धुवून त्यांचे मोठे तुकडे करून घ्या. कांदा, हिरवी मिरची आणि लसूणही चिरून ठेवा.

टोमॅटो कापून घ्या

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर लसूण आणि हिरवी मिरची घालून हलके परतून घ्या.

फोडणी करा

Picture Credit: Pinterest

 त्यात चिरलेला कांदा घालून तो मऊ आणि किंचित सोनेरी होईपर्यंत परता.

कांदा परता

Picture Credit: Pinterest

आता टोमॅटोचे तुकडे घालून त्यात हळद, लाल तिखट आणि मीठ मिसळा.

टोमॅटो घाला

Picture Credit: Pinterest

 कढई झाकून मध्यम आचेवर टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटोमधील पाणी आटल्यावर गॅस बंद करा.

टोमॅटो शिजवा

Picture Credit: Pinterest

मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. चटणी जास्त घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालू शकता.

चटणी वाटा

Picture Credit: Pinterest

तयार चटणीत बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा. ही चटणी पोळी, भाकरी, डोसा, इडली किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest