Honda CB350ची नवी रेंज लाँच! 1.95 लाखांपासून 8 व्हेरिएंट्स

Automobile

22 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Hondaने CB350 कुटुंब अपडेट केलं आहे. यात CB350, CB350RS आणि CB350C या तीन बाइक्स असून एकूण 8 व्हेरिएंट्स मिळतात.

तीन बाईक्स, 8 पर्याय

Picture Credit:tata

नवीन CB350ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1,95,200 आहे. टॉप CB350 व्हेरिएंटची किंमत ₹1,99,900 पर्यंत जाते.

किंमत कुठून सुरू?

Picture Credit:tata

स्पोर्टियर लूक असलेल्या CB350RS ची किंमत 1,99,900 पासून सुरू होते. DLX व्हेरिएंटसाठी 2,02,500 मोजावे लागतील.

CB350RS कितीला?

Picture Credit:tata

क्लासिक स्टाइल आवडणाऱ्यांसाठी CB350C उपलब्ध आहे. याची किंमत 2,00,300 पासून सुरू होऊन Special Editionसाठी 2,04,700 पर्यंत जाते.

CB350Cची खास रेंज

Picture Credit:tata

2026 अपडेटमध्ये Hondaने मुख्यतः नवे कलर, डार्क थीम आणि फ्रेश ग्राफिक्स दिले आहेत. तीनही बाइक्सची मूळ रेट्रो डिझाइन थीम कायम आहे.

लूकमध्ये नेमका बदल काय?

Picture Credit:tata

CB350 फॅमिलीमध्ये 348.6cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन कायम आहे. म्हणजे मोठा मेकॅनिकल बदल करण्याऐवजी Hondaने लूक आणि फीचर्सवर भर दिला आहे.

इंजिन मात्र तेच

Picture Credit:tata

रेंजमध्ये Honda RoadSync कनेक्टिव्हिटी, Assist & Slipper Clutch, Dual-Channel ABS आणि Selectable Torque Control सारखी फीचर्स मिळतात.

फीचर्समध्ये काय मिळतं?

Picture Credit:tata

तीनही मॉडेल्सची किंमत एकमेकांच्या जवळ आहे. त्यामुळे निवड करताना CB350चा क्लासिक लूक, CB350RSचा स्पोर्टी अंदाज की CB350Cची हेरिटेज स्टाइल यापैकी तुमची पसंती महत्त्वाची ठरणार आहे.

कोणती CB350 घ्याल?

Picture Credit:tata