Published April 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
उपवासात काय खायचं हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. तेच तेच खावून कंटाळा येतो
उपवासाचे कटलेट हे टेस्टी असण्यासोबतच एनर्जीसुद्धा देतात
काकडी, बटाटा, शिंगाड्याचं पीठ, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर
काकडी धुवून सालं काढून किसून स्वच्छ धुवून घ्यावी
एका बाउलमध्ये काकडी पिळून तिचं पाणी बाजूला करा, मग त्यात बटाटा, शिंगाड्याचं पीठ, मीठ, हिरवी मिरची घालावी
थोडीशी कोथिंबीर घालून सगळं साहित्य नीट मळून घ्या, टिक्की तयार करा
तयार टिक्की गरम तेलात क्रिस्पी आणि गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या