www.navarashtra.com

Published On 31 March 2025 By  Prajakta Pradhan

चैत्र नवरात्रीत ही स्वप्ने पाहणे असते शुभ

Pic Credit -   Pinterest

दुर्गादेवीला समर्पित चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते

चैत्र नवरात्री

नवरात्रीमध्ये विशिष्ट प्रकारची स्वप्ने पाहणे शुभ मानले जाते.

नवरात्रीमधील स्वप्न

नवरात्रीमध्ये कोणती स्वप्ने पाहणे हे दुर्गा मातेच्या आशीर्वादाचे लक्षण असू शकते?

कोणती स्वप्न शुभ 

स्वप्नात देवी दुर्गा स्वतःला सिंहावर स्वार होताना पाहणे जीवनातील सकारात्मक बदल दर्शवते.

सिंहावर स्वार

या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आपण आपल्या शत्रूंवर विजय मिळवू शकता.

स्वप्नाचा अर्थ

नवरात्रीच्या दिवसात श्रृंगाराचे सामान दिसणे. जसे की बांगडी, बिंदी, सिंदूर किंवा लाल चुनरी पाहणे हे वैवाहिक समस्या संपण्याचे लक्षण असू शकते.

श्रृंगाराचे सामान 

स्वप्नात हत्ती दिसणे किंवा देवी दुर्गा हत्तीवर स्वार झालेली पाहणे हे काही मोठ्या यशाचे लक्षण असू शकते.

हत्ती

नवरात्रीच्या दिवसात स्वप्नात दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू दिसणे म्हणजे हे एखाद्या कामात यश किंवा मान वाढवण्याचे संकेत देऊ शकते.

दुधापासून बनवलेल्या वस्तू

स्वप्नात देवी दुर्गेची प्रतिमा दिसणे अतिशय शुभ मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की तुमच्यावर देवी दुर्गेचा आशीर्वाद आहे.

देवीची मूर्ती