फक्त खाऊन दैनंदिन आहाराच्या पौष्टिक गरजा पूर्ण करणे कठीण आहे. यासाठी आहारामध्ये नट्स, सुका मेवा याव्यक्तिरिक्त फळांचा देखील समावेश करावा.
चिकू असे फळ आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहे आणि हे गोड फळ आहे. या फळांचा हंगाम वर्षभरात दोनदा येतो. फेब्रुवारी ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर
हिवाळ्यात चिकू खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. हे असे फळ आहे जे गरम असते. यामुळे शरीर आतून गरम राहण्यास मदत होते
चिकूमध्ये थोड्या प्रमाणात प्रथिने असतात. याव्यक्तिरिक्त फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, विटामीन सी, विटामीन ए हे गुणधर्म असतात.
चिकूमध्ये सर्वांत जास्त विटामीन सी असते. चिकूमध्ये 14.7 मिलीग्राम विटामीन सी असते. याशिवाय कॅल्शिअमची मात्रा 21 मिलिग्राम असते.
या फळामुळे आरोग्य, पचन आणि हृद्यासाठी फायदेशीर आहे. विटामीन सी अधिक होण्याने त्वचा चांगली राहते. यामुळे हे फळ खूप फायदेशीर आहे.
चीकू हे गोड असे फळ आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्स असते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी हे फळ कमी प्रमाणात खावे.