Published Jan 27, 2025
By Shweta Chavan
Pic Credit - pinterest
दिल्लीतील एकूण ७० जागांपैकी १२ जागा राखीव आहेत. १९९३ ते २०२० पर्यंत झालेल्या निवडणुकीत, राखीव जागा जिंकण्यात जो पक्ष यशस्वी झाला, तो सत्तेत आला.
२०१३ मध्ये आम आदमी पक्षाने १२ पैकी ९ राखीव जागा जिंकल्या आणि नंतर २०१५, २०२० च्या निवडणुकीत क्लीन स्वीप करण्यात यश मिळवले.
२०११ च्या जनगणनेनुसार दिल्लीतील सुमारे १७ टक्के लोक दलित आहेत.
दलितांच्या ३६ उपजाती राहतात ज्यात जाटव, वाल्मिकी, धोबी, रेगर, खटिक, कोळी बैरवा यांचा समावेश आहे.
१२ जागा राखीव असल्या तरी, इतर १८ जागांवरही दलित मतदार निर्णायक ठरतात. पूर्वी १३ राखीव जागा होत्या
गेल्या तीन निवडणुकांमध्ये ही व्होट बँक 'आप'च्या खात्यात गेली आहे.
मंगोलपुरी, गोकलपूर, बवाना, कोंडली, सुलतानपूर मजरा, करोल बाग, मादीपूर, पटेल नगर, आंबेडकर नगर, देवली, त्रिलोकपुरी, सीमापुरी