www.navarashtra.com

Published  Nov 29, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

आता भारताच्या कोणत्या खेळाडूंनी आयसीसी रँकिंगच्या टॉप ५ मध्ये जागा मिळवली आहे यावर एकदा नजर टाका.

कसोटी फॉरमॅटमध्ये आयसीसी रँकिंगच्या पहिल्या क्रमांकावर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विराजमान आहे.

जसप्रीत बुमराह

टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आहे.

रविचंद्रन अश्विन

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा एकमेव फिरकीपटू कुलदीप यादव आयसीसी रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

कुलदीप यादव

.

टेस्ट क्रिकेटच्या आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल दुसऱ्या क्रमांकावर आहे, सध्या त्याचा चांगला फॉर्म सुरु आहे.

यशस्वी जयस्वाल

.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये आयसीसी रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्मा

कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलूच्या रँकिंगमध्ये भारताचा ऑल राउंडर रवींद्र जडेजा पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

रवींद्र जडेजा

एकदिवसीय फॉरमॅटमध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत, यामध्ये शुभमन गिल आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शुभमन गिल

रवींद्र जडेजाच्या खाली भारताचा दिग्गज अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आयसीसी कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रविचंद्रन अश्विन

आयसीसी रँकिंगच्या एकदिवसीय फॉरमॅटमध्ये भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली

T२० रॅकिंगमध्ये भारताचे दोन खेळाडू आहेत, यामध्ये भारताचा युवा तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तिलक वर्मा

टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा आयसीसी T२० फॉरमॅटमध्ये अष्टपैलूच्या रँकिंगमध्ये पहिले स्थान नावावर केले आहे.

हार्दिक पांड्या

आयसीसी T२० क्रिकेटच्या रँकिंगमध्ये भारताचा T२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आहे.

सूर्यकुमार यादव