स्टाटर्ससाठी, पार्टीजसाठी अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पोटॅटो बाइट्स एक उत्तम पर्याय ठरतो
Picture Credit: iStock
यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून नीट मॅश करून घ्या
त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ घाला. सर्व एकत्र मिक्स करा
थोडं मिश्रण हातात घेऊन त्यात हवे असल्यास छोटा चीजचा तुकडा भरून बाईट्सचा आकार द्या
तयार बाईट्सना ब्रेड चुरामध्ये किंवा तांदळाच्या पिठात घोळवा, जेणेकरून ते तळताना कुरकुरीत होतील.
कढईत तेल गरम करून यात पोटॅटो बाइट्स टाका आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या
गरमागरम पोटॅटो बाईट्स टोमॅटो केचप किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा
तयार बाईट्स तुम्ही डीप फ्राय, एअर फ्राय किंवा पॅन फ्राय सुद्धा करू शकता