लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गर्लिक ब्रेडची चव फार आवडते, याची रेसिपी फार सोपी आहे
Picture Credit: iStock
एका कढईत बटर हलकंसं गरम करा आणि त्यात बारीक चिरलेली लसूण घालून १-२ मिनिटं परतून घ्या.
त्यात मीठ, मिरपूड आणि कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करा
तयार मिश्रण ब्रेड स्लाइसवर एकसारखं पसरवा.
जर हवं असेल तर वरून थोडं चीज पसरवा.
ओव्हनमध्ये किंवा तव्यावर मध्यम आचेवर ब्रेड दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या. ओव्हनमध्ये १८०°C वर ५-७ मिनिटं बेक करा.
शेकलेली ब्रेड कापून गार्लिक स्टिकच्या आकारात कापा.
तयार झालेलं गरमागरम गार्लिक ब्रेड सॉस किंवा सूपसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.