एका भांड्यात गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, हिंग, जिरे, आले, हिरवी मिरची व कोथिंबीर घाला.
Picture Credit: iStock
त्यात ताक किंवा पाणी थोडे थोडे घालत, पातळसर डोशाच्या पीठासारखा घोळ तयार करा. गाठी राहू देऊ नका.
हे पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
तवा गरम करा. थोडं तेल टाका आणि हलकं पुसून घ्या.
तव्यावर पातळसर पीठ गोलसर पसरवा. डोशाचा आकार गोलसर असू द्या.
वरून थोडंसं तेल शिंपडा. झाकण ठेवून मध्यम आचेवर डोसा शिजवा. खालची बाजू खरपूस झाली की पलटण्याची गरज नाही.
डोसा तव्यावरून हलक्या हाताने काढा आणि नारळाची चटणी किंवा लोणच्याबरोबर गरम गरम सर्व्ह करा.