सर्वांच्या आवडीची चिकन चिली आता तुम्ही घरीही तयार करू शकता
Picture Credit: iStock
एका भांड्यात चिकनचे तुकडे, कॉर्नफ्लोअर, आले-लसूण पेस्ट, मीठ, मिरीपूड आणि अंडं मिक्स करा आणि १५-२० मिनिटं बाजूला ठेवा.
कढईत तेल गरम करा. मॅरिनेट केलेले चिकन मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळून झाल्यावर टिशू पेपरवर ठेवा.
दुसऱ्या पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या परता.
कांदा आणि शिमला मिरची घालून २-३ मिनिटं परतवा. भाज्या थोड्या कुरकुरीत राहतील इतपतच शिजवा.
टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, साखर आणि थोडंसं मीठ घालून नीट मिक्स करा.
एका वाटीत एक चमचा कॉन्फ्लोर आणि पाणी घेऊन एक घोळ तयार करा आणि मिश्रणात टाका, सोबतच तळेलेले चिकनचे तुकडेही घाला
वरून कोथिंबीर पसरवा आणि गरम गरम चिकन चिली खाण्यासाठी सर्व्ह करा!