Hit-and-Run झालं तर कोणता Camera कामी येणार? Dashcam की Helmet Cam?

Automobile

19 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

अपघातानंतर समोरचं वाहन पळून गेल्यास त्याचा नंबर किंवा ओळख पटवणं अवघड होऊ शकतं. अशावेळी कॅमेऱ्यातील व्हिडिओ उपयोगी ठरू शकतो.

Hit-and-Runमध्ये फुटेज ठरू शकते महत्त्वाचे

Picture Credit:pinterest

Dashcam बाइकवर फिक्स केलेला असतो आणि रस्त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. त्यामुळे प्रवासादरम्यान समोर घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवता येते.

Bike Dashcam कसा काम करतो?

Picture Credit:pinterest

एकदा योग्य ठिकाणी बसवल्यानंतर कॅमेरा स्थिर राहतो. त्यामुळे राइडरला सतत कॅमेऱ्याचा अँगल बदलण्याची गरज पडत नाही.

Dashcamचा हा फायदा लक्षात ठेवा

Picture Credit:pinterest

हा कॅमेरा हेल्मेटवर बसवला जातो. राइडर ज्या दिशेने पाहतो, त्याच दिशेतील घटना कॅमेऱ्यात टिपल्या जातात.

Helmet Cameraमध्ये काय खास?

Picture Credit:pinterest

राइडिंगदरम्यान डोक्याची हालचाल होत असल्याने फुटेजचा अँगल बदलू शकतो. तसेच प्रत्येक राइडपूर्वी कॅमेरा सुरू आहे की नाही, हे तपासावं लागतं.

पण Helmet Cameraची मर्यादा काय?

Picture Credit:pinterest

Dashcamचा कॅमेरा बाइकच्या दिशेने स्थिर फुटेज देतो. Helmet Camera मात्र राइडरच्या नजरेनुसार दृश्य टिपतो. त्यामुळे वापराची पद्धत वेगळी आहे.

दोन्हीमध्ये नेमका फरक काय?

Picture Credit:pinterest

वाहनाचा नंबर, रंग, मॉडेल आणि अपघाताची वेळ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. उपलब्ध असल्यास कॅमेऱ्यातील संबंधित फुटेज लगेच सुरक्षित करा.

अपघात झाल्यास हे तपशील जपा

Picture Credit:pinterest

घटनेची मूळ व्हिडिओ फाइल सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे. Original footage डिलीट होणार नाही याची काळजी घ्या आणि बॅकअप ठेवा.

फुटेज एडिट करण्याआधी विचार करा

Picture Credit:pinterest

रस्त्यावर अचानक घडलेल्या घटनेची नोंद कॅमेऱ्यामुळे उपलब्ध होऊ शकते. Dashcam असो किंवा Helmet Camera, नियमितपणे Recording आणि Storage तपासणं महत्त्वाचं आहे.

बाइक कॅमेरा का ठरू शकतो उपयोगी?

Picture Credit:pinterest