नवीन Baleno CNG-AMT ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹8.32 लाख आहे. CNG कारमध्ये Automaticची सुविधा हवी असणाऱ्यांसाठी हा नवा पर्याय आहे.
Picture Credit:nexaexperience
Baleno CNG-AMT Delta आणि Zeta ट्रिममध्ये उपलब्ध आहे. म्हणजे ग्राहकांना बजेटनुसार एकापेक्षा जास्त पर्याय मिळतात.
Picture Credit:nexaexperience
यात 1.2-लिटर, 3-सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. CNGवर हे इंजिन 70hp पॉवर आणि 102Nm टॉर्क देते.
Picture Credit:nexaexperience
इंजिनसोबत 5-स्पीड AMT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्यामुळे विशेषतः शहरातील ट्रॅफिकमध्ये वारंवार गिअर बदलण्याचा त्रास कमी होतो.
Picture Credit:nexaexperience
Baleno CNG-AMT चे कंपनीकडून 34.47 km/kg मायलेज असल्याचा दावा करण्यात आला आहे. CNG-MTच्या तुलनेत हे मायलेज 0.86 km/kg अधिक आहे.
Picture Credit:nexaexperience
Balenoमध्ये CNG टाकी बूटमध्येच देण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्पेअर व्हीलही बूटमध्ये असल्याने सामान ठेवण्यासाठी उपलब्ध जागा खूपच कमी राहते.
Picture Credit:nexaexperience
Baleno CNG-AMTला Tata Altroz CNG-AMTकडून थेट स्पर्धा मिळते. Altrozमध्ये ट्विन CNG सिलिंडर वापरले असून 210 लिटर लगेज स्पेस उपलब्ध आहे.
Picture Credit:nexaexperience
CNGचा कमी रनिंग कॉस्ट + Automaticची सोय हवी असेल तर Baleno CNG-AMT आकर्षक पर्याय ठरू शकते. मात्र कमी बूट स्पेस हा खरेदीपूर्वी लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे.
Picture Credit:nexaexperience
₹8.32 लाखांपासून Baleno CNG-AMT बाजारात दाखल झाली आहे. 34.47 km/kg मायलेज, 5-स्पीड AMT आणि CNGची बचत यामुळे शहरातील वापरासाठी ही कार चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Picture Credit:nexaexperience