www.navarashtra.com

Published Jan 28,  2025

By  Shweta Chavan

दिल्ली निवडणुकीत ५ अब्जाधीश उमेदवार,कोण आहे सर्वात श्रीमंत उमेदवार? 

Pic Credit -  iStock

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यासाठी भाजप, आम आदमी पार्टी, काँग्रेससह राजकीय पक्ष जोरदार प्रचारात गुंतले आहेत.

मतदान

दिल्ली निवडणूक लढवणाऱ्या सर्वात श्रीमंत उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.

श्रीमंत उमेदवारांची यादी

दिल्ली निवडणुकीत भाजपचे कर्णैल सिंह हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे २५९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे

भाजप

एडीआरच्या अहवालानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी पाच उमेदवार अब्जाधीश आहेत

५ अब्जाधीश उमेदवार

कर्नैल सिंह – (शकूर बस्ती येथील भाजप उमेदवार) – एकूण मालमत्ता – २५९६७३६०९० म्हणजेच २५९ कोटींहून अधिक

कर्नैल सिंह

मनजिंदर सिंग सिरसा – (राजौरी गार्डनचे भाजप उमेदवार), एकूण मालमत्ता – २,४८,८५,५२,४४४ रुपये म्हणजेच २४८ कोटींहून अधिक

मनजिंदर सिंग सिरसा

गुरचरण सिंग (राजू) – (कृष्णा नगर येथील काँग्रेस उमेदवार), एकूण मालमत्ता – १,३०,९०,५२,००० रुपये म्हणजेच १३० कोटींहून अधिक

गुरचरण सिंग

परवेश साहिब सिंह - (नवी दिल्लीतील भाजप उमेदवार), एकूण मालमत्ता - १,१५,६३,८३,१८० रुपये म्हणजेच ११५ कोटींहून अधिक

परवेश साहिब सिंह

धनवती चंडेला – (राजौरी गार्डनमधून आप उमेदवार), एकूण मालमत्ता – १,०९,९०,०५,५२२ रुपये म्हणजेच १०९ कोटींहून अधिक 

धनवती चंडेला