Published Jan 27, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
एकमेकांशी खुलेपणाने संवाद न साधणे, मनातील भावना दडपून ठेवणे, यामुळे नात्यात दुरावा येतो.
खोटं बोलणं, फसवणूक किंवा लपवाछपवी केल्याने विश्वास कमी होतो आणि नातं कमकुवत होतं.
जोडीदाराकडून अती अपेक्षा ठेवणे किंवा त्यांना सतत बदलण्याचा प्रयत्न करणे नात्यात ताण निर्माण करतात.
नात्यात वेळ कमी केल्यास जोडीदाराला दुर्लक्षित वाटू शकते.
वाद झाले तरी त्यावर वेळेवर तोडगा न काढल्यास नाराजी वाढते. यामुळे नातं उध्वस्त होऊ शकतं.
जोडीदाराची इतर लोकांशी तुलना केल्याने त्यांचं आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांना अपमानित वाटतं.
जोडीदाराच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधनं घालणे किंवा त्यांना नेहमी संशयित नजरेने पाहणे नकारात्मक परिणाम करते.
नेहमी स्वतःच्या गरजा, भावना, किंवा मतांना महत्त्व देऊन जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास नातं कमकुवत होतं.